आपण मला ओळखता,पुरेसं आहे.

[tta_listen_btn]


●आपण आपल्या जीवनात नेमकं काय कमावलं हे आजच्या दिवशी आपल्याला माहीत पडतं,तुमच्याकडे किती पैसा आहे,तुम्ही किती श्रीमंत आहात हे कोणी पाहत नाही,तुम्ही कधी,कुठे लोकांच्या किती कामी पडलात आणि लोकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब समाजात उमटत असते,मी इतरांसाठी खूप काही केलं असं अजिबात नाही माझ्याच्याने जे शक्य झालं ते प्रत्येक गोष्टीत करत आलोय,तेही तुम्हा सर्वांचे सहकार्य घेऊन! एखाद्याला मदत ही केवळ पैशानेच करता येते हा गैरसमज आहे,छोट्या छोट्या गोष्टीतूनही समोरच्याला आनंद देता येतो आणि तो प्रत्येक वेळी मी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलोय,कित्येक अनोळखी ज्यांची प्रत्यक्षात कधी भेटही झाली नाही त्यांच्याही अनलिमिटेड शुभेच्छा मिळाल्या,मेसेंजर,इन्स्टाग्राम,फेसबुक,व्हाट्सएप शुभेच्छांनी भरून गेलय, मला प्रसिद्धीची हौस नाही,हे केलं ते केलं म्हणून नाव मोठं करण्यासाठी झटण्याचीही गरज नाही,मला बॅनर लावण्याची गरज नाही,मला प्रसिद्धीची कधीच गरज पडली नाही की स्वतःला प्रकाशझोतात आणावे असेही कधी वाटले नाही,हा माझा स्वभाव नाही,वाढदिवसाला एवढ्या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आणि फोनकॉल्स प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही,मी मात्र याबाबतीत भाग्यवान आहे,माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाला एवढ्या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा येण्याचं काय कारण असावं? असा मनात विचार येतो तेंव्हा ही निस्वार्थीपणाची आणि प्रमाणिकतेची पावतीच होय याच निष्कर्षाप्रत पोहोचतो.मी आजतागायत कोणतेही काम स्वतःचा फायदा करून घेण्याच्या किंवा आपली तुंबडी भरून घेण्याच्या किंवा वैयक्तिक स्वार्थ साधण्याच्या हेतूने केल्याचे मला आठवत नाही,नव्हे मला ती आवश्यकताही कधी वाटली नाही.
●आपणा सर्वांच्या माझ्यासाठीच्या शुभेच्छा ह्या निस्वार्थी आहेत,तुमच्या मनातून आलेल्या आहेत ही जाण आहे मला.मी राजकारणी नाही त्यामुळे एखाद्या पक्षाच्या,नेत्याच्या चुकीच्या धोरणावर मी बोलणार नाही असे होणार नाही कारण समाजाच्या दृष्टीने जे घातक असेल त्यावर मी बोललेच पाहिजे आणि प्रत्येकानेही बोलण्याची हिम्मत ठेवली पाहिजे परंतु असे होत नाही ! ज्यांच्याकडे समाजाला योग्य दिशा दाखविण्याचं काम आहे असे मोठमोठे साहित्यिक,लेखक,कवी काही अल्प मोबदल्यात विकले जातात,काही पुरस्काराच्या तुकड्यावर आपले विचार गहाण ठेवतात ही स्थिती पाहून मन उद्विग्न होते.असो हा विषय नको आज!
●कोजागिरी असल्याने सगळे मित्र जागे होते याचा परिणाम असा झाला की रात्रीपासूनच शुभेच्छांचा पाऊस पडायला सुरुवात झाली,बासुंदी खातांना कित्येक जणांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला पण शेवटी थकलो आणि झोपी गेलो,सकाळी उठून बघतो तर काय व्हाट्सएप आणि मेसेंजर शुभेच्छानी मस्त फुगलेले! इतकं प्रेम खूप कमी लोकांना मिळतं! माझा गोतावळा,माझा पसारा मला खूप प्रिय वाटतो,कित्येकांना मी पर्सनली रिप्लाय देऊ शकलो नाही याबद्दल खंतही वाटते.तुमचे प्रेमाचे दोन शब्द प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी उर्जादायी वाटतात.एखाद्या पुढाऱ्याला जेवढ्या शुभेच्छा मिळत नाही त्याच्या कितीतरी अधिक पटीने मला मिळाल्या हे माझं भाग्यच नाही का? माणसाने शेवटी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या वृत्तीमध्ये कृतीमध्ये फरक ठेवून वागू नये,लोकांना सांगताना खूप सांगायचं आणि सख्या भावासोबत जमिनीच्या एका तुकड्यासाठी कोर्टात न्यायचं आणि नेमकी हीच वृत्ती माझ्या स्वभावात नाही! जे शक्य तेवढच बोलायचं,शक्य तेवढच करायचं आपल्या वागण्यातून,कृतीतून कोणाचे नुकसान होणार नाही यावर कटाक्ष ठेवायचा,बिमारी दूर करण्यासाठी इंजेक्शन द्यावच लागतं पण त्या इंजेक्शनचं दुखणं हे जसं दुःखावणारं नसतं अगदी तसच आपलं वागणं असलं पाहिजे! मी मुळातच मला ज्या वाईट गोष्टी वाटल्या त्या संगतीत गेलो नाही,वेळोवेळी चांगले मित्र लाभले,चांगली माणसे भेटत गेली त्यामुळेच मला आयुष्यात काहीतरी करता आले,अजूनही चांगल्या लोकांची संगत शाबूत आहे ही माझ्यासाठी सकारात्मक बाजू आहे.ज्यांना मी समजलो ते सोबत आहेत,ज्यांनी समजूनच घेतले नाही त्यांना सोडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी