Poem

बाबासाहेब

तुम्ही आमच्यासाठी काय केलंहे आज विचारू नकाआमच्या मनात आत्ताही तुमचा तिरस्कारओतपोत भरलेला आहे!आमच्या मनाच्या कोपऱ्यातून तुमची जातकधी नष्ट होऊ देणार नाहीअशी व्यवस्थाच निर्माण करण्यात“ते” यशस्वी होताहेत…या व्यवस्थेला जेवढे “ते”तेवढेच आम्ही स्वतःलातुमचे सैनिक म्हणवून घेणारेही जवाबदार आहोततुमच्या नावाचा वापर आणितुमचा फोटो कुठे वापरायचा याचे कसब“ते” शिकतांनाचआम्ही सैनिकांनीही शिकून घेतलेतुमच्या विचारांशी आज काय देणं घेणंतुमच्या नावावर आम्हाला […]

बाबासाहेब Read More »

काय सर तुम्ही ?

brown man face figurine

काय सर तुम्ही ?चमचा सोडून हाताने जेवताहातहो काय झालंकाही स्टेटस वैगेरे आहे की नाहीकसलं स्टेटसबाजूला बघा प्रत्येक जणचमच्याने जेवतोयमगतुम्ही असे कसे गावंढळमाझा चेहरा पडला नाहीकी वाईटही वाटलं नाहीतिला जवळ बोलावलंबघ लहानपणी माझी आईहातानेच जेवू चारायचीलहानपणापासून मी सुद्धाहातानेच जेवायला शिकलोचमच्याने घेतलेल्या घासानेआजही माझं पोट भरत नाहीकारण जगातल्या कोणत्याही चमच्यानेआईच्या हाताची बरोबरी केली नाहीज्या चमच्याने माझ्या मायेचीकधी

काय सर तुम्ही ? Read More »

ठरवायचं असतं प्रत्येकानं

blooming oxalis triangularis with purple leaves

हाताच्या रेषेत भविष्य असतंकी कपाळावरच्या रेषेत ते दिसतंकी घामाच्या थेंबात ते वसतंहे ठरवायचं असतं प्रत्येकानंसमोरच्या माणसावरविश्वास ठेवण्यागोदरचिकित्सा आणि तर्कअसतो करायचाअन समोरचा काय म्हणतोयते खरं कि खोटं हे हीबघायचं असतं तपासूनखोटी गोष्ट दहा वेळाओरडून सांगितली कीती सर्वांनाच खरी वाटायला लागतेअन खऱ्याच्या प्रकाशाला लागतंखोट्याचं ग्रहण…सत्याला मरण नसतं तरखोट्याला शेवटी सरण असतंहिशोब प्रत्येकाचा होत असतोमाझा,तुझा,खऱ्याचा,खोट्याचाभविष्याच्या अथांग सागरात……

ठरवायचं असतं प्रत्येकानं Read More »

देह नश्वर आहे

brown statue

देह नश्वर आहेतो नष्ट होणेच आहेआज तू, उद्या मीनक्कीच मरणार आहेआज तू बिमार आहेसमी ही नेहमीच बिमार पडतोडॉक्टरांकडे गेल्याशिवायदोघेही बरे होत नाहीसंकटे तुझ्यावरही येतातमाझ्यावरही आलीच होतीतू खूप पूजा केलीसआणि मी केली नाहीम्हणून माझी संकटे वाढलीअन तुझी संकटे कमी झालीअसे कधी झाले नाहीदेवदैवाचा बाजारमनाच्या भीतीने वाढतोकर्मावर ज्याचा विश्वासतो दैव नव्हेतर कर्माच्या नितीवर चालतोगहू पेरला तर तांदूळ

देह नश्वर आहे Read More »

मी खोटे बोलेन

aerial view of lai chau city vietnam

मी खोटे बोलेन,तुझ्याशी,त्याच्याशी..मी बोलेन वाईटतुझ्याविषयी,सर्वांविषयी..मी करेन चुगल्यातुझ्या,सर्वांच्या..तुझ्या,तुमच्या पाठीमागे..!!मी स्वतःशीबोलू शकेन का खोटेवागेन का खोटेअनस्वतःचीच करेन काखोटी स्तुती……माझी चूक,माझा नालायकपणामाझा नीचपणामला स्वतःलाचआवडत नाही….

मी खोटे बोलेन Read More »

मी वाहतो कुठेही….

silhouette of person sitting beside body of water

तुजसारखा नाही जरीजीव लावतो कुठेहीदुर्गुण असेना कितीहीपण धावतो कुठेही…द्वि भूमिकेत कधीहीवावरने जमले नाहीखोट्याला कधीहीसावरणे जमले नाहीझरा क्षुलक नाल्याचामी वाहतो कुठेही….आरशासम जगणे हेलपवणे जमले नाहीखोट्या विश्वात स्वतःलारमवणे जमले नाहीकर नित्य सभ्य कामेतो पावतो कुठेही…..

मी वाहतो कुठेही…. Read More »

दुःखात आनंद

दुःखात आनंदआनंदात दुःखसंसार अश्रूंचामहा पूर…खोट्याने मारलेसत्याने तारलेदुतोंडी जगणेकामी नाही….खोट्याची महिमाचमकते खोटीसत्याला मरणनाही जगी…माणूस कोणतानसतो वाईटचुकांची गणनामाणसाची….सत्याशी तो संगअसत्याशी असंगहाच माझा रंगसदोदित….

दुःखात आनंद Read More »

तू दुधावरची साय

तू दुधावरची सायमी करपलेली भाकरमी फुटलेलं दूध अनतू मधातली साखर…तू बहरलेला चाफामी बाभळीचा काटादुपारच्या उन्हामध्येनको चालू रानवाटा…नभ दाटले आकाशीमी बेधुंद जसा वाराआयुष्यात माझ्या तूजशा विरणाऱ्या गारा….

तू दुधावरची साय Read More »

पाटीलकी

तांदूळ विकून कोंडाखात असतो आम्हीदमडी नसतांनाही“पाटीलकी “दाखवत असतो आम्ही..।।जात बांधवांचेच पायआम्ही सदा खेचत असतोमनुवाद्यांच्या सोबतीनेएकमेकांचीच ठेचत बसतो..।।पस्तीस एकराचे आताआम्ही पाचावर आलोठसणीपायी सर्व काहीव्यर्थ गमवितच गेलो…।।झाले सर्व नष्ट पणठसन काही गेली नाही,देवधर्मावर उधळले सारेपण शिक्षणावर मुलांच्याखर्च कधी केला नाही..।।साडेतिनवाल्यांनी हक्क आमचेखाऊन सारे फस्त केलेशिव्या देण्या दुसऱ्या जातीआमचेच कुणबी धन्य झाले..।।

पाटीलकी Read More »

गेलेले दिवस

अरे जे झालं ते झालंजुनं पुन्हा आठवू नकोसगेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या साठवू नकोस…. त्या भेटीगाठी तेंव्हाच्याविसावा घेऊ देत नाहीमनात आलं जरी पणजवळ तुझ्या येता येत नाही,मोगऱ्याचं फुल तेंव्हाचंवेड्या आत्ता पाठवू नकोस….गेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या साठवू नकोस…. तुझ्या प्रेमाची माझ्यानेना कधीही किंमत झालीकाळजातुन बाहेर यायलाना हुंदक्यांची हिम्मत झाली,थरथरणाऱ्या ओठांना माझ्यातुझ्या ओठांनी गोठवू नकोसगेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या

गेलेले दिवस Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी