Poem

तुझिया शब्दाला

तुझिया शब्दालाविचारितो कोणआपलीच लालसदोदित…..धर्मचिया भाषाअसे मुखावरीकृती विपरीतसंघोट्याची…..दुसरा तो लफंगसदा तुज वाटेस्वतःचे लफडेझाकोनियां…..दुसऱ्याचे विचारकवडीमोल तुजआपलाच हेकाउरावरी……तुझी ठेकेदारीसांभाळ र येळयाहलकट निर्बुद्धभक्तांसाठी….शिकवू नको ज्ञानआम्हास तू लेकावारस आम्हीतुकोबांची…..

तुझिया शब्दाला Read More »

पावसाची धुंद सर

पावसाची धुंद सरअन तुझी आठवणथेंबा थेंबाने झिरपणारेतुझ्यासोबतचे ते क्षण….हवेत उडणाऱ्या तुझ्या मऊकेसातून अलगद हात फेरावाआणि चिंब व्हावे मन,फुलांवर अळखळलेल्या थेंबातहीतुझा चेहरा दिसावादेहभान विसरून तृप्त व्हावे तन………बसावे न्याहाळत निखळ सौन्दर्यअविरत संततधार………..आसक्तीचा थेंबही नसावातुझे सौन्दर्य न्याहाळताना………असावं प्रेम वासनाविरहितशुद्ध झऱ्यासारखंनिर्माण होऊ नये मनातआसक्तीचा,वासनेचाकाळाकुट्ट व्रण….कलुषित होऊ नये तन…मन

पावसाची धुंद सर Read More »

अस्पृश्य…

ज्यावेळेला महारांनाविहिरीवर लोकं पाणी भरायलाअर्धीच विहीर द्यायचे,त्यांच्या सावलीलाही विटाळ मानायचेत्यांच्या कपातला चहापण नाही प्यायचेअगदी त्याचवेळेला माझ्या घरातल्या चुलीपर्यंतही महारांची पोरं बिनधास्त फिरायची,सोबत जेवायची,सोबत खेळायचीमहारांच्या लग्नात आमचे कुनबी जायचे नाहीमला आठवतं…एका महाराच्या मुलीच्या लग्नाचं जेवणयांच्यासाठी आमच्या घरी ठेवलं होतंअन अख्खा गाव जेवला होता…गावातल्या मुसलमानाच्या घरीमी नेहमीच शिरखुरमा खायचोते माझ्या जिवलग मित्राचं घर होतंदोस्त म्हणून माझ्या घरी

अस्पृश्य… Read More »

तू दिसलीस बऱ्याच दिवसांनी

तू दिसलीस बऱ्याचदिवसांनीनजर तीच,नजरेला नजर मिळताचचेहऱ्यावर आलेलंस्मितहास्यही तेच होतंअन्गालावर पडणारी खडीहीअगदी तीच होती….अलगद तुझ्या डोळ्यांच्यापापण्यात आलेलाआसवाचा थेंब….कदाचित बोलायचं होतंतुला माझ्यासवे..मुक्तपणे….पण तुझ्या ओठांनीबोलण्याची परवानगीचनाकारली तुला…मला तर परवानगीनव्हतीच कधी…..

तू दिसलीस बऱ्याच दिवसांनी Read More »

पोटातली भूक,पोटात मारली….

बापानं खस्ता खाल्ल्यापोराले शिकवासाठीएका फाटक्या बन्यानवरआयुष्य काढलं…पोरगं शाळेत गेलंशाळेचा सर्व खर्चउचलासाठी बापानंपोटातली भूक,पोटात मारली….पोराकडून लईच आशाठेवून होता बाप….पोरगं बी लई शिकलंशिकून खूप मोठ्ठं झालंपेपरात मोठ्ठ नाव आलंशिकलेली बायको केलीबापासाठी नातवं आली…आता घराच्या एका कोपऱ्यातदहा फुटांवरून ढकललेल्याताटात जेवन करत तो बापगावभर सांगतोमाझा पोरगामाझा मान राखतो आहे……अन्लोकांना दिसू नये म्हणून तो बापती फाटलेली बन्यानफाटक्या धोतरानं झाकतो आहे….

पोटातली भूक,पोटात मारली…. Read More »

बघ बाबासाहेब दिसतो का…..?

काय म्हणतोस दादाबाबासाहेबांचा तू स्वतःलावारस म्हणतोयसहरकत नाही..आनंद आहेबरं एक सांग तू विचाराने वारसआचाराने वारस की फक्तत्यांच्या नावाचाउपयोग करणारा सारस…बुद्धाचे पंचशील मानतोसकी बाबासाहेबांनी दिलेल्याबावीस प्रतिज्ञा पाळतोस..काय एवढ्यातच राग आलाय??बुद्धाची शांती मनी ठेवहिंसा मनात आणू नकोसएक कर तुझ्या घराच्या भिंतीवरबाबासाहेबांच्या बाजूलालावलेला विक्तुबाबाचा फोटो जर्रासाबाजूला कर…..बघ बाबासाहेब दिसतो का…..?

बघ बाबासाहेब दिसतो का…..? Read More »

तुझ्या गुलाबी ओठावर

प्रत्येक माणूसच इथेअसतो एकसारखा,तुझ्या गुलाबी ओठावर,वक्षावर आणि नितंबावर,तिरप्या नजरेने कटाक्षटाकून उघडपणे बलात्कार करणारा….जुने लोक आजही म्हणतातबाईने हात दिला नाही तरमाणसाची काय बिशादपण प्रत्येकच माणूसनसतो “माणसा” सारखा!म्हणून आपणही थोडंसावध असावं,काळजी घ्यावी मांड्याउघड्या पडणार नाही याची!माणसात जनावरच असतो..हे गृहीत धरून चलत्याच्या जनावर होण्याचीआजवर तरी कोणीच दिली नाही…..शाश्वती….

तुझ्या गुलाबी ओठावर Read More »

तू लढ म्हणतोस म्हणून

तू लढ म्हणतोस म्हणूनआम्ही लढायचं काभावालाच कुऱ्हाडीनेतोडायचं का?हिंदू हिंदू म्हणून आम्हालातू नेहमीच डीवचतोसदुसऱ्यांना आतंकवादी म्हणूनआपल्यांना सोडायच का?..धर्माचं भूत घालून तूसोयीस्कर बाहेर राहतोसआपलं झाकून दुसऱ्यांचंउघडून पाहायचं का?…चल तू म्हणतोस म्हणूनएकदा तुझही ऐकून घेतोत्याबदल्यात तुझी काळं कृत्यआमच्या पोरांनी पुसायचं का?

तू लढ म्हणतोस म्हणून Read More »

खोट्या आसवांचां…

प्रेमाच्या नावे तुझाहा बहाणा कशालासमजावया तुझे प्रेम मजहा जमाना कशाला_||प्रीत तुझी तीखोटी खोटीच होतीनव्हते मनात तुझ्यामग मी निशाणा कशाला_||विरहात जगण्याची हीमाझीच रीत आहेखोट्या आसवांचां तुझ्याहा मुलामा कशाला__||

खोट्या आसवांचां… Read More »

शुद्धलेखनाची ऐशी तैशी…..

आमच्या पिढ्या गेल्यात खेड्यातआणि खड्डयात सुद्धाआम्हाला मन होतं तेंव्हाहीआणि आहे आत्ताहीफरक एवढाच होता कीत्यावेळीआम्ही फक्त विचार करत होतोमनातल्या मनात…..काही लिहिण्याची परवानगीचनव्हती अन व्यक्त होण्याची तरनव्हतीच नव्हती कधी…..आता आम्ही व्यक्त होताहोतआता लिहू लागलो आम्हीआमची माय गावातलीतुले मलेची भाषाआमच्या मायेच्या गावातली…चल तुझी वाटरी भाषा ठेव बाजूलातुझ्या शुद्धलेखनाची ऐशी तैशी…..

शुद्धलेखनाची ऐशी तैशी….. Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी