जे सत्य ते स्वीकारले पाहिजे.

[tta_listen_btn]


■धर्म श्रद्धा,कर्मकांड,देवत्व या माझ्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी म्हणून या गोष्टींना कधीच खूप महत्व दिले नाही परंतु कोणी देव,श्रद्धा यावर विश्वास ठेवून भक्ती करत असेल,देवाच्या पाया पडत असेल,अगरबत्ती लावत असेल तर कधी या गोष्टीचा विरोधही केला नाही कारण विरोध करून काही उपयोग होत नसतो,देव ही कल्पना माणूस जन्माला आल्यापासून घरातल्या आणि सामाजिक वातावरणामुळे त्याच्या मनात घट्ट बसलेली असते ती सहजासहजी काढून फेकता येत नाही,वर्षानुवर्षे ही संकल्पना चालत आली आहे,आमच्या आजोबांनी देव पुजले म्हणून आमच्या बापानी देव पुजले आणि बापानी पुजले म्हणून आपण पूजत असतो परंतु साधा प्रश्न डोक्यात निर्माण होत नाही की यामुळे आपणास कोणता लाभ होतो,देव न पूजल्यास कोणती हानी होते कारण ही पिढ्यान पिढ्या बिंबवलेली गोष्ट एका क्षणी कोणीच काढू शकत नाही,प्रश्न विचारायचेच नसतात हे आमच्या मनावर कोरल्या गेलं आहे.
■कित्येक लोकं सहज विचारतात की तुमचा देव या गोष्टीवर विश्वास आहे का? मी कोणतेच उत्तर देत नाही! मी मित्रांसोबत मंदिरात जातो,डोक्यावर टिळा लावतो,अगरबत्ती लावून पाया देखील पडतो,मला माहित असतं की या गोष्टींमुळे काही फरक पडणार नाही परंतु आपली माणसं दुखावतील त्याचं काय? आणि ते मला नको असतं! मी प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतो,काय खरं काय खोटं हे मी जाणू शकतो परंतु याचा अर्थ असा होत नाही की मी देव,धर्म मानत नाही म्हणून इतरांनीही माझ्यासारखं वर्तन करावं.कर्मकांड हा भाग देवधर्मापेक्षाही कठीण आहे,हे केलं नाही तर लोकं काय म्हणतील ही मुख्य गोष्ट यामागे कार्यरत असते,कर्मकांडाने काहीच साध्य होत नाही, पैशाचा आणि वेळेचा अपव्यय होतो.
■परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि तो हळुवारपणे होत असतो,लाखो वर्षांआधी मंदिरात जाणाऱ्यांची संख्या जेवढी होती ती आजघडीला आहे का? आज नवीन पिढी मंदिराच्या काठावरही जात नाही,कित्येक वर्षांपासून होळी साजरी होते,होळीला नवैध दाखविण्याचा प्रघात आहे,मी लहानपणी एकदा काय ते होळीत नवैद्य टाकून आलो त्यापलीकडे मला कधी आठवत नाही की मी पुन्हा तेथे गेलो असेल, मुलाची आई म्हणते बापू बापानं त सोडलस तू तरी पुढं ने आमचा बापू नाक मुरडून दिलेलं नवैद्य त्याठिकाणी फेकून येतो,हे कशासाठी करतात हे त्याला माहित नाही पण कालांतराने बापू ते अन्न त्याठिकाणी बिलकुल फेकणार नाही ही खात्री आहे,हे परिवर्तन आहे! जे हळूहळू होत जातं.
मी माझ्या आयुष्यात कोणत्याही बाबा,साधू,भोगसाधूच्या कधी पाया पडलो नाही की त्यांची पूजा केली नाही,मला ती गरज कधीच पडली नाही आणि आताही पडत नाही.चमत्काराला मी थारा देत नाही.कर्म सिद्धांतावर माझा विश्वास आहे,आपण चांगले काम केले तर चांगले आणि वाईट केले तर वाईटच परिणाम येतील,हे ठरलेलं आहे! मग यात देवाची काय भूमिका? कित्येक काळे धंदे करणाऱ्या लोकांच्या ऑफिसात देवांचे फोटो लावलेले दिसतील ते याच साठी असतात,त्यांची अशी धारणा असते की आपल्या हातून लोकांचे वाईट झाले तरी तो भिंतीवर लावलेला देव आहे तो नक्कीच सर्व माफ करेल,त्यांच्या मनात असलेल्या भीतीने ते अधिकाधिक काळे धंदे करत राहतात,देवामुळे त्यांच्या मनातली काळे काम करण्याची भीती निघून गेलेली असते आणि अशीच लोकं आपल्या काळ्या कृत्यामधून कमविलेल्या काही रकमेचा वापर करून देवाला मोठं करत असतात.अशा कित्येक मोठ्या आसामीना मी पाहिलय की देवाची पूजा तास तास न चुकता करतात पण बाहेर मात्र त्यांच्या एवढे त्यांच्याच भाषेत पापी कोणी नसतात.
■सामान्य माणसाची दुसरी गोष्ट, एक उदाहरण मी माझ्याच पत्नीचे घेतो, माझे सासरे एका बिमारीने ग्रस्त होते,बरीचसे दवाखाने पालथे घातले,छु छा सर्वच पाहून झालं परंतु त्या बिमारीवर एकही इलाज यशस्वी होऊ शकला नाही,अशातच माझ्या पत्नीने शिर्डीच्या साईबाबांचा नवस ठेवला की माझ्या बाबांची तब्येत सुधरू दे,मी एक हजार तुझ्या दानपेटीत टाकेन! काही दिवसांनी माझे सासरे मरण पावले. ते गेले बिमारीने पण यात देवाने म्हणा किंवा साईबाबाने म्हणा कसलीही मदत केली नाही आणि हे सत्य असून आपलं मन ते सत्य नाकारू शकत नाही कारण वर्षानुवर्षे या गोष्टीने मानवी मनावर ताबा मिळविलेला असतो! नेमकं त्या वेळेस मी म्हंटल असतं की तुझ्या बापाला जी बिमारी झाली आहे त्या बिमारीवर इलाज नाही,असेही ते जातीलच तर पत्नीची प्रतिक्रिया काय असती? पण ती देव देव करते तिला तिची चूक समजेपर्यंत मी काही म्हणणार नाही,म्हणू शकत नाही कारण माझ्या यशस्वितेमध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे.
■#हमे_बिमारसे_नही_बिमारिसे_लढणा_है।
कित्येक जे स्वतःला परिवर्तनवादी समजतात ते इथेच गल्लत करतात,सरळ देवाला शिव्या घालून मोकळे होतात पण ते हे समजून घेत नाही की जोपर्यंत समोरच्या माणसाच्या मेंदूतून ती प्रतिमा हटत नाही तोपर्यंत कोणत्याही माणसात परिवर्तन होत नाही,समजा एखादा मड्डी आहे,त्याला आपण कितीही दाखले देऊन,दारू वाईट गोष्ट आहे ती सोड म्हणून डोकं आपटून जरी सांगितलं तरी तो तोपर्यंत दारू सोडणार जोपर्यंत त्याच्या मनात स्वतः दारू सोडण्याबद्दल विचार येणार नाही किंवा त्याचे स्वतःचे फार मोठे नुकसान होत नाही,उलट हे जरा जास्तच शहाणं आहे,मले शहाणपण शिकवते का असा तो मनातल्या मनात तुम्हाला शिव्या घालेल, माणूस अनुभवाने शिकत असतो,वाचनाने तर्क करत असतो,चिकित्सा करत असतो त्या आधारे खरे खोटे ठरवीत असतो,काही गोष्टीत तो सहज लोकं करतात म्हणून त्यांचे अनुकरण करत असतो, माझा मुलगा स्कुटीने रोज शाळेत जातो,एकदिवस त्याच्या मागे माझी गाडी होती,रस्त्यात जसे नाग मंदिर लागले तसे त्याने स्कुटीची बेल वाजवली,समोर गेल्यावर मी त्याला विचारलं,अरे ते मंदिर आलं तेंव्हा बेल का वाजवली त्याने सहज उत्तर दिलं,लोकं इथं आले की बेल वाजवतात म्हणून मीही वाजवली, तर हे असं असतं त्याला या गोष्टीतलं काही एक माहीत नसताना तो लोकं करतात म्हणून आपणही करायला लागला.
■सर्वसाधारणपणे माणसाचे आयुष्यमान हे शंभर वर्षे पकडल्या जाते,मग तो कोणताही माणूस असू द्या! शंभर वर्षाच्या वर तो जगणार नाही.देवाला,धर्माला मानणारी माणसे सुखाने शंभरच्या वर जगली आणि न मानणारी किडे पडून मेली असे कुठे झाले नाही,देवधर्म न मानणाऱ्या माणसाला जी संकटे येतात,ज्या व्याधी त्या शारीरिक असो वा मानसिक येतात त्या देवधर्म मानणाऱ्यालाही येतात,त्यात कुणाल 20% सूट वैगेरे मिळते असे होत नाही,माणूस केवळ भीतीपोटी किंवा आपले स्वतःचे वाईट होऊ नये असे वाटून भक्तिभावाने देव पूजीत बसतो परंतु वर नमूद केल्याप्रमाणे तुमचं येणारं भविष्य हे तुमच्या कामावर ठरलेलं असतं त्यात कुठेही देवधर्माचा हात असत नाही,अपघात,नैसर्गिक आपत्ती कोणाला चुकलेल्या नाहीत, गाडीवर जयश्री राम म्हणून लिहून असलं म्हणजे तो अपघातातून वाचेल असे कुठेही होत नाही,आपण अधून मधून ऐकत असतो की देवदर्शनाला गेलेल्या बसचा अपघात होऊन दहा मेले,मग दहा मरणाऱ्या पैकी दहाही पापी असतात का? तसे काहीच नसते, मानवी चुकांमुळे आणि नैसर्गिक असंतुलनामुळे अपघात,आपत्ती येत असते,जी सर्वांवर येते तो धार्मिक असो वा नास्तिक असो कोणाला ते चुकत नाही.
■हो निसर्ग एक शक्ती आहे,तीच सर्वकाही आहे,तीच देव आहे,तीच धर्म आहे.प्रत्येक गोष्ट निसर्ग नियमानुसारच घडून येते,कोरोनाच्या काळात महामारीत जगाच्या कोणत्याही देशात देव,अल्लाह,येशू कामी पडलेला नाही,एक जंतू आला आणि मानवाचे जीवन असह्य केले,गेल्या शतकात आलेली प्लेगची साथ असो वा इतर महामारी असो यावर माणसानेच तोडगा काढलेला आहे,विज्ञानाने विजय मिळविलेला आहे,जे सत्य ते स्वीकारले पाहिजे,मला कोण काय म्हणतो त्याने काहीच फरक पडत नाही,काम केल्याशिवाय पोट भरत नाही,दे गा हरी खाटल्यावरी म्हणत बसल्याने कोणताही हरी अन्न देत नाही.

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

4 thoughts on “जे सत्य ते स्वीकारले पाहिजे.”

  1. JAYANT SALVE

    या साईट वर मला माझे लेख किंवा कविता पोस्ट करता येईल का उमेश दा ? जर नाही असेल तर problem नाही. पण हो असेल तर कसे पोस्ट करावे याबद्दल सांगाल का ? बाकी तुमच्या लिखाणात आता एक चांगला आणि प्रबोधनात्मक विचार यायला लागला आहे जो वाचकाला विचार करण्यास नक्कीच बाध्य करतो. शुभेच्छांसह ,
    जयंत साळवे

    1. नक्कीच दादा, अशी व्यवस्था नक्कीच करेन, तुम्हाला जागेवरून पोष्ट करता येईल,ज्या साईटवर ऑटोमटीक प्रसारित होईल

    2. Shailaja molak

      आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आपण समविचारी आहोतच. समाजप्रबोधन व चिकित्सक विचार मांडणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून आपण काम करत आहात. त्यासाठी मनापासून अभिनंदन .!
      लिहित रहा.. आपले विचार मांडत रहा.. आजच्या काळात ते जास्त गरजेचे आहेत..
      धन्यवाद 🙏
      ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी