अस्पृश्य…
ज्यावेळेला महारांनाविहिरीवर लोकं पाणी भरायलाअर्धीच विहीर द्यायचे,त्यांच्या सावलीलाही विटाळ मानायचेत्यांच्या कपातला चहापण नाही प्यायचेअगदी त्याचवेळेला माझ्या घरातल्या चुलीपर्यंतही महारांची पोरं बिनधास्त फिरायची,सोबत जेवायची,सोबत खेळायचीमहारांच्या लग्नात आमचे कुनबी जायचे नाहीमला आठवतं…एका महाराच्या मुलीच्या लग्नाचं जेवणयांच्यासाठी आमच्या घरी ठेवलं होतंअन अख्खा गाव जेवला होता…गावातल्या मुसलमानाच्या घरीमी नेहमीच शिरखुरमा खायचोते माझ्या जिवलग मित्राचं घर होतंदोस्त म्हणून माझ्या घरी […]