[tta_listen_btn]
राग कुणाचा धरू कशाला
द्वेष कुणाचा करू कशाला
चार दिवसाचे जगणे इथले
दुखवून सर्वांना मरू कशाला..
जमले नाही जे करावया गेलो
अपेक्षांचे भार वहावया गेलो
ज्यांची आस नव्हती कधीही
स्वप्न का मी ते पहावया गेलो..
मनासारखे का कुठे घडते येथे
जखम बसलेली चिघळते येथे
तप्त तव्यावर रोजच आता
मेनासम आयुष्य वितळते येथे..
कोणी कुणाचा जगी होत नसतो
जीव कुणासाठी कोणी देत नसतो
माझ्यावाचून कुणाचे का अडले होते
हिशोब आपला कोणी का घेत नसतो..
खंत नाही जराही उरात आता
काहीच उरले नाही घरात आता
दिसते जसे जग ते नसते कधीही
काढू नका पुन्हा नुसती वरात आता..