पाटीलकी

तांदूळ विकून कोंडा
खात असतो आम्ही
दमडी नसतांनाही
“पाटीलकी “
दाखवत असतो आम्ही..।।
जात बांधवांचेच पाय
आम्ही सदा खेचत असतो
मनुवाद्यांच्या सोबतीने
एकमेकांचीच ठेचत बसतो..।।
पस्तीस एकराचे आता
आम्ही पाचावर आलो
ठसणीपायी सर्व काही
व्यर्थ गमवितच गेलो…।।
झाले सर्व नष्ट पण
ठसन काही गेली नाही,
देवधर्मावर उधळले सारे
पण शिक्षणावर मुलांच्या
खर्च कधी केला नाही..।।
साडेतिनवाल्यांनी हक्क आमचे
खाऊन सारे फस्त केले
शिव्या देण्या दुसऱ्या जाती
आमचेच कुणबी धन्य झाले..।।

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी