Poem

राग कुणाचा धरू कशाला

राग कुणाचा धरू कशालाद्वेष कुणाचा करू कशालाचार दिवसाचे जगणे इथलेदुखवून सर्वांना मरू कशाला.. जमले नाही जे करावया गेलोअपेक्षांचे भार वहावया गेलोज्यांची आस नव्हती कधीहीस्वप्न का मी ते पहावया गेलो.. मनासारखे का कुठे घडते येथेजखम बसलेली चिघळते येथेतप्त तव्यावर रोजच आतामेनासम आयुष्य वितळते येथे.. कोणी कुणाचा जगी होत नसतोजीव कुणासाठी कोणी देत नसतोमाझ्यावाचून कुणाचे का अडले […]

राग कुणाचा धरू कशाला Read More »

फुललेला मोगरा

माझ्याकडे पाहून…..तुझ्या दारावरफुललेला मोगरामला डीवचतकिती हसतोयहर्षाने….!मी म्हणालोमस्त हसून घे बेटाकधीकाळीमला हसविणारी तीआज तुझ्या सोबतीला आहेती जिकडे असतेतिकडेआनंदी आनंदच असतो गड्या….

फुललेला मोगरा Read More »

नातं तुझं नि माझं

Free woman walking on railway

नातं तुझं नि माझंऊन पावसाचा खेळ,तुझ्या मिठीत येण्यानाही मिळत सवड!प्रश्न भाकरीचा येतोजातो शोधण्यात वेळ,बसेना तुझ्यासाठीकसलाच ताळमेळ!वेदना कुणा सांगूतू नसता जवळ,दुःखी मनाची होईनेहमीच जळजळ!ये मिठीत सखयेनको सावळा गोंधळ,मुक्त जगून घेऊथोडा उरलेला वेळ!

नातं तुझं नि माझं Read More »

तुझ्या कुशीत…

तुझ्या कुशीत मी शांत विसावतोअन तुझ्या मुलायम केसातुनहळूच हात फिरवतोतेंव्हा तू घट्ट मिटून घेतेस डोळे….माझ्या छातीवर जेंव्हाडोकं असतं तुझं निर्विकारपणेतेंव्हा असंख्य प्रश्न सुटलेले असताततुझ्या मनातले…तूही स्तब्ध अन् मीही स्तब्धचदोघांच्या मनात बोलायचं असतंबरच काही….सोडवायची असतात असंख्य कोडीअसंख्य प्रश्नेही….पण ओठांवर कधी ती येतच नाहीत..काय यालाच तर प्रेम म्हणत नाही?दूर असलो की तुझी आठवण का येतेहाच तर मोठा

तुझ्या कुशीत… Read More »

तुझ्याशिवाय….

ना तू धोका दिलासना मी धोकेबाज होतोतू नाकारलसतोच माझ्या आयुष्याचाटर्निंग पॉईंट ठरला…माझ्यासमोर तेंव्हादोनच पर्याय होते,दोनच प्रश्न होते…..प्रेम की पोट ?मी पोट निवडलंअन् त्याचवेळीपोटासाठी पायपीट करण्यासमी कायमचा मोकळा झालो….तुझ्याशिवाय….

तुझ्याशिवाय…. Read More »

प्रेम असावं..

प्रेम असावं निरपेक्ष,आभाळासारखं निरभ्र….जीव ओतून केलेलं…निर्मळ आणि शूभ्र….मावळत्या सूर्यासारखी ऊबदारअसावी,सोबतीची जाणीव….सगळे आसपास असले…तरी…भासावी एक उणीव…सागरासारखा अथांग असावा विश्वास…..एक दुसऱ्यासाठीचघ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास….हातातून वाळूसारखे निसटून जातात कण…आयुष्यात अस्तव्यस्त,तुझ्या असण्याचे क्षण,का? कुठे, सलते तुझी एक एक आठवण…….

प्रेम असावं.. Read More »

ती….

woman holding pink petaled flower

कोणीही आजारी असलं की तीसतत दवाखान्यात चोवीस तासबसायची काळजी घेत….ती नेहमी म्हणायचीमाझ्या डोक्यावर पाय देऊनतू आलासउष्ट दूध प्यायला आईचं…ती भांडली,बोलली वा शिव्याहीदिल्या असतील तिनेअन् निघूनही गेली गळबळीतन सांगताचकायमची….राख्या दिसतात बाजारातभावांच्या हातांवरत्यांच्या बहिणींनी बांधलेल्याआतारिकामाच असतो माझा हातपोरका,अनाथ…..

ती…. Read More »

काय असतं प्रेम

काय असतं प्रेमदूर असून कायम हुरहूर असते हृदयातते असतं प्रेम……ती जवळ नसतानाही तीच मनात घुटमळतेते असतं प्रेम……कोणत्याही अपेक्षेशिवाय तिच्यासाठीडोळ्यात असतात अश्रूते असतं प्रेम…….हक्काने तिच्या कुशीत विसावता येतेते असतं प्रेम……..तिच्यासाठी तिच्या दुःखासाठीहीमनात होतात वेदनाते असतं प्रेम…….आकर्षण,वासना,स्वार्थावरत्यागाने मिळविलेला विजयम्हणजेच असतं प्रेम……

काय असतं प्रेम Read More »

माणूस

आपलं कुणीतरी असावंआपण कुणासाठी तरी असावंकोणीतरी आठवण काढावी आपलीआपल्या आठवणीत कोणीतरी असावं….जगताना थोड्या आयुष्यातथोडं दुसऱ्यांसाठी झटावंआपल्या हृदयानेही एखाद्यासाठीतीळ तीळ तुटावं…..कधी जगून पहा असं कीसगळे हळहळले पाहिजेतुझ्या हृदयातून माझ्यासाठीरक्त भळभळले पाहिजे….चार दिवसाची जिंदगी हीकाय कुणावर रुसावंअंधार जाऊन उजेड येतोचमग उगाच का रडत बसावं..….

माणूस Read More »

मुलगी होऊन जा…….

ती आज पहिल्यांदातीचं घर सोडत होतीआई,वडील,भाऊसगळ्यांनाच सोडूननव्या घराचा उंबरठाओलांडत होती… खांद्यावर डोकं ठेवूनहमसून हमसून रडत होतीआईचा हुंदका दाटत होताबापाच्या डोळ्यातले अश्रूडोळ्यात होतेतो तिच्या डोळ्यातले शेवटचेअश्रू पुसत होता…. सासू सासऱ्यांकडे बोट दाखवतबापाने तिलाएकच सांगितलंआता तेच तुझे माय बापत्यांचा सांभाळ करप्रत्येक सुखतुझ्या पायाशी लोळण घेईल……. सून तर कोणीही होईलत्यांच्या आयुष्यातत्यांची मुलगी होऊन जा……..

मुलगी होऊन जा……. Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी