उमेश पारखी

सौन्दर्य चिरकालीन नसतं

सौन्दर्य चिरकालीन नसतं,तसं …तारुण्य देखील चिरकालीन नसतं.सौन्दर्याचा साज आणि वयाचा माजउतरला,की जाणीव होत असते प्रत्येकाला!आठवते प्रत्येकाला,आपण भूतकाळात कसे वागलो ते…..सौन्दर्य अन् तारुण्याच्या गर्वानेदूर सारलेली माणसे,उतरत्या वयात वाटतात हवीशी,तेंव्हा नसतात कोणीही अवतीभवतीज्यांना म्हणू शकू आपली.आणि पश्चातापात जळायला लागतंते सौन्दर्य आणि तारुण्य….वयानुसार उमटतात सुरकुत्याचेहऱ्यावर, अन्ओझही वाढतं जवाबदाऱ्यांचं!तेंव्हा सारीच मस्तीअसते विझलेली……

सौन्दर्य चिरकालीन नसतं Read More »

एका संघर्षाची गोष्ट

जग बदलवू इच्छिणारे बरेच मिळतील, जग बदलवू पाहणारा एखादाच असतो-ऍड.मारोती कुरवटकर! एक संघर्षमय प्रवास!■एखादा माणूस आपल्या जीवनाचा संघर्षातून इतरांसाठी आदर्श कसा ठरतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे ऍड.मारोती कुरवटकर!गरिबी,तुरुंगवास अशा अनंत यातना भोगून व्यवस्थेच्या नाकावर टिचून वकील बनणारा आमचा मित्र मारोती!आज 25 जुलै त्याचा वाढदिवस,त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याचा जीवनप्रवास उलगडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करीत आहे,ही पोष्ट

एका संघर्षाची गोष्ट Read More »

माझं प्रिय घर

फेसबुक पोष्ट : माझ्या घराचं चित्र बघून अनेक मित्रानी मनाला सुखावून टाकणाऱ्या कमेंट्स दिल्या,मी अत्यंत सुखावून गेलो! घराला सहा वर्षे पूर्ण झाली त्याची आठवण म्हणून हा फोटो लावला होता! कोणाची नजर न लागो असे म्हणतात पण अशा नजरा माझ्या कोणत्याच गोष्टींना लागत नसतात नव्हे तशा भुक्कळ अंधश्रद्धाळू गोष्टींवर माझा विश्वास आधीही नव्हता,आत्ताही नाही,ज्या गोष्टीसाठी घाम

माझं प्रिय घर Read More »

माझा धर्म ?

इतर लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याचा विचार माणसाने कधीच करू नये,व्यक्ती तितक्या नजरा असतात,लोकांना समोरचा माणूस आपल्या मताचा,आपल्या विचाराचा असावा हीच अपेक्षा असते,लोकांच्या नजरेत आपण काय आहोत आणि त्यांना जसं हवं तसही खरं तर वागण्याची गरज नसते.प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या दृष्टिनुसार आपल्याविषयी त्याच्याकडे एक विशिष्ट असं मत बनलेलं असतं.आपण जे वागतो,बोलतो यात आपण कधीच चुकत नाही

माझा धर्म ? Read More »

साहित्यिक जमात

🌿असं म्हणतात की वैचारिक क्रांती ही साहित्यातून होत असते,चांगल्या साहित्यातून चांगल्या माणसाची निर्मिती होत असते,चांगले साहित्य आणि चांगली माणसे निर्माण होण्याच्या काळाचा आज वर्तमानात ऱ्हास व्हायला लागला आहे. प्रस्थापित व्यवस्थेवर लिहिणारे लेखक ,कवी फार तर बोटावर मोजण्याइतके मिळतील,आपलं व्यवस्थित चाललय ना,मग कशाला उडती काटी अंगाला लावून घ्यायची अन उगीचच कशाला कोणासोबत संबंध खराब करून घ्यायचे

साहित्यिक जमात Read More »

मनातलं सारं काही : समीक्षण

▪️राम बोढेकर सरांच्या एखाद्या पुस्तकावर माझ्या सारख्या पामराने लिहिणे म्हणजे तेजोमय सुर्यासमोर काजव्याने चमकण्यासारखे होय.विपुल ज्ञान संपदा लाभलेले अत्यंत साधे संयमी असे हे व्यक्तिमत्व आहे.सरांसोबत माझी फारशी ओळख नाही,माझा मित्र प्रख्यात लेखक,कवी डॉ.किशोर कवठे यांच्या सहवासात त्यांची ओळख झाली.त्यांच्याबद्दल माहिती मिळाली,त्यांची एक दोन वेळा भाषणं ऐकण्याची संधी मिळाली,त्यांची वक्तृत्वशैली एवढी सुंदर आहे की ते बोलताना

मनातलं सारं काही : समीक्षण Read More »

तू म्हणाली

तू म्हणालीपुन्हा कधी येतोसमी म्हणालोभरवसा नाही..तू म्हणालीस एकदामाझ्या जगातपरत येऊ नकोसमी कधीच आलो नाहीतू न बोलवताहीमला यावं लागलंमाझं मलाच समजलं नाहीपुन्हा कधी येतोसविचारलस!मी उमजलो नाहीमी एवढच समजून चुकलोहृदयाच्या एका कोपऱ्यातमाझा एक कप्पाअजून शिल्लक आहे…..

तू म्हणाली Read More »

राग कुणाचा धरू कशाला

राग कुणाचा धरू कशालाद्वेष कुणाचा करू कशालाचार दिवसाचे जगणे इथलेदुखवून सर्वांना मरू कशाला.. जमले नाही जे करावया गेलोअपेक्षांचे भार वहावया गेलोज्यांची आस नव्हती कधीहीस्वप्न का मी ते पहावया गेलो.. मनासारखे का कुठे घडते येथेजखम बसलेली चिघळते येथेतप्त तव्यावर रोजच आतामेनासम आयुष्य वितळते येथे.. कोणी कुणाचा जगी होत नसतोजीव कुणासाठी कोणी देत नसतोमाझ्यावाचून कुणाचे का अडले

राग कुणाचा धरू कशाला Read More »

फुललेला मोगरा

माझ्याकडे पाहून…..तुझ्या दारावरफुललेला मोगरामला डीवचतकिती हसतोयहर्षाने….!मी म्हणालोमस्त हसून घे बेटाकधीकाळीमला हसविणारी तीआज तुझ्या सोबतीला आहेती जिकडे असतेतिकडेआनंदी आनंदच असतो गड्या….

फुललेला मोगरा Read More »

आपण मला ओळखता,पुरेसं आहे.

●आपण आपल्या जीवनात नेमकं काय कमावलं हे आजच्या दिवशी आपल्याला माहीत पडतं,तुमच्याकडे किती पैसा आहे,तुम्ही किती श्रीमंत आहात हे कोणी पाहत नाही,तुम्ही कधी,कुठे लोकांच्या किती कामी पडलात आणि लोकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब समाजात उमटत असते,मी इतरांसाठी खूप काही केलं असं अजिबात नाही माझ्याच्याने जे शक्य झालं ते प्रत्येक गोष्टीत करत

आपण मला ओळखता,पुरेसं आहे. Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी